सिल्लोड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटना अध्यक्ष रफिक शेरखान यांचा शिवना येथे सत्कार

सिल्लोड तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेचे अध्यक्ष रफिक शेरखान यांनी कोरोना काळात शिवना येथील त्यांना संलग्न असलेल्या शिवना येथील कार्ड्स ऑनलाईन , धान्य वितरण व विविध योजनांवर लाभ मिळवून देण्यात अग्रेसर राहील्याने आज दिनांक 7/6/2022ला शिवना येथे भेट दिली असता गावातील जेष्ठ व माजी जिल्हापरिषद सदस्य मुरलीधर काका काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले यावेळेस सरपंच पती रघुनाथ वाघ ,नारायण काळे,गणेश काळे, पुण्यनगरीचे वार्ताहर अमोल काळे, गणेश राणा,शंकर भागवत, मन्नान भाई, अरुण काळे, विजय डोंगरे, गजानन जगताप, शंकर वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.विशेष म्हणजे दिड वर्षापूर्वीहि जेव्हा रफिक शेरखान यांच्याकडून संलग्न असलेल्या शिवन्यातील तीन दुकानी काढून घेण्यात आल्यानंतर हि कार्डधारकांकडून त्याचा व त्याना वाटपास मदत करणारा त्यांचा मुलगा सअद खान पठाण यांचा हि सामाजिक सत्कार करण्यात आला होता.
या वेळेस अंपग ,विधवा ,वंचित लाभार्थीस धान्य व शिधापत्रिका मिळवून देण्या बाबत पाठपुरावा करून लाभ मिळवून देण्यात येणार असून या मोहिमेत लोकसहभाग आवश्यक असून सहकार्य करावेत असे सांगून समारोपात पुन्हा सत्कार केल्याबद्दल रफिक शेरखान यांनी आभार व्यक्त केले.