google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

अहेरीत वीजेचा लपंडाव; 33 केव्ही उपकेंद्र सुरू झाल्यापासून दिवसभरात तब्बल 33 वेळा वीज खंडित

गडचिरोली जी. प्र. जावेद अली

अहेरी येथे नव्याने 33 केव्ही उपकेंद्र सुरू करण्यात आले असले तरी नागरिकांना सुरळीत वीजपुरवठ्याऐवजी सततच्या वीज खंडित होण्याचा सामना करावा लागत असल्याची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार सकाळपासून सायंकाळपर्यंत तब्बल 33 वेळा वीज ये-जा होत असून संपूर्ण शहर व परिसरातील गावकरी त्रस्त झाले आहेत.

 

उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. घरातील पंखे, कुलर, पाण्याच्या मोटारी बंद पडत असल्याने लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच सततच्या लो-व्होल्टेज आणि ट्रिपिंगमुळे इलेक्ट्रॉनिक उपकरणे खराब होण्याची भीती नागरिक व्यक्त करीत आहेत

 

.
व्यापारी वर्गालाही या समस्येचा मोठा फटका बसत आहे. संगणक, इंटरनेट सेवा, ऑनलाईन व्यवहार आणि दुकानदारांचे दैनंदिन कामकाज वारंवार बंद पडत असल्याने आर्थिक नुकसान होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांची तयारीदेखील प्रभावित होत आहे.

 

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, 33 केव्ही उपकेंद्र सुरू झाल्यानंतर वीजपुरवठा सुधारेल अशी अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात अधिकच समस्या निर्माण झाल्या आहेत. तांत्रिक बिघाड, निकृष्ट देखभाल किंवा यंत्रणेमधील त्रुटींमुळे ही परिस्थिती निर्माण झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

 

नागरिकांनी महावितरण प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा त्वरित सुरळीत करावा, तांत्रिक तपासणी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे

Share
Back to top button