लाॅयड मेटल्स आणि त्रिवेणी विरोधात फोरम आक्रमक
फोरम तर्फे जनहितचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

विशेष प्रतिनिधी नागेंद्र चटपल्लीवार द्वारा
गडचिरोली : भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान अय्युबभाई कच्छी व फोरमच्या पदाधिकाऱ्यांना वारंवार गडचिरोली जिल्ह्यातिल जनतेकडुन सुरजागढ येथिल लाॅयड मेटल्स खनीज प्रकल्प विरोधात तक्रारी येत होत्या. त्यानुसार दिनांक 15 मे 2026 ला फोरम तर्फे माननीय मुख्यमंत्री तथा पालकमंत्री गडचिरोली राष्ट्रपती, राज्यपाल, व केंद्रीय उत्खनन मंत्री यांना मान.जिल्हाधिकारी गडचिरोली मार्फत निवेदन पाठविन्यात आले.
तालुका एटापल्ली जिल्हा गडचिरोली येथिल सुरजागढ येथे बहुचर्चित लाॅयड मेटल्स एनर्जी तथा त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनी द्वारा खनीज प्रकल्पाचे काम युद्ध स्तरावर सुरु आहे.प्रकल्पातुन कोणते खनिजद्रव्य मिळत आहे? याबाबत जनतेत उलट सुलट चर्चा सुरु आहे.कुणी सोने, चांदी,हिरे तर कुणी लोखंड निघत असल्याचे वेगवेगळे तर्क वितर्क लावत आहेत.खरे काय ते प्रशासनालाच माहिती आहे.
एकीकडे जंगल वाचवा म्हणून 33 कोटी झाडे लावल्या जाते तर दुसरीकडे 66 कोटी लागलेली झाडे तोडुन 14 कीलोमीटरचा जंगलपट्टा संंपुर्णत: नष्ट केल्या गेला.विषेश म्हणजे या जंगलतोडीला वनविभागाची परवानगी नसल्याची कुजबुज सुरु आहे.
एटापल्ली वरुन गडचिरोलीला येतांना सुरजागढचे पहाडांवर जिथे उत्खनन सुरु आहे,ते पहाडं घनदाट जंगलामुळे अदृश्य होते.ज्यांचे जवळुनही दर्शन होत नव्हते, त्यांचे आता 14 कीलोमीटर दुरुन दर्शन होत आहे.याचा अर्थ कीती मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाली, याची कल्पना करता येते.ही झाली फक्त जंगल तोडीची बाब.माननीय मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात जंगल (वनसंपदा) व्यतिरीक्त गडचिरोली जिल्ह्याची जलसंपदा, जमीन,जीवं आणी रोजगार कशी धोक्यात आहे.याची माहिती दिली आहे .
मान.जिल्हाधिकारी यांनी भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया च्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवुन जनतेच्या भावना कळविनार असल्याचे व संबंधित दोषींवर कारवाई करन्याचे आश्वासन दिले. फोरमला या बाबतीत लवकर कळविनार असल्याचेही सांगितले आहे.भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया तर्फे या प्रकल्पाविरोधात जनतेच्या भावना जाहिरपणे व्यक्त करीत राहनार.
अर्शदजी कच्छी राष्ट्रीय अध्यक्ष युथ विभाग,शोएबजी कच्छी राष्ट्रीय प्रसिद्धि प्रमुख,देवाभाऊ हिंगोरानी चंद्रपुर महानगर अध्यक्ष,दिनेशजी मिश्रा गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख, नागेन्द्र चटपल्लीवार भद्रावती तालुका अध्यक्ष, सरफराज खान पठाण भद्रावती शहर अध्यक्ष यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

