अंमली पदार्थ गांजा विकणाऱ्या कुख्यात सराईत महिला आरोपीविरूध्द चंद्रपूर शहर पोलीसांची धडक कार्यवाही

चंद्रपूर :- पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे दि. १९/०७/२०२५ रोजी स.पो.नि./ राजेंद्र सोनवणे सोबत डि. बी. स्टॉफसह पो.स्टे. परिसरात पेट्रोलींग करित असता मुखबीरद्वारे खबर मिळाली की, भिवापूर वार्ड, चंद्रपूर येथे दोन महिला आपले राहते घरी अवैध्यरित्या गांजा सदृष्य वनस्पती बाळगुन विकी करीत आहे अशा माहितीवरून नमुद ठिकाणी पो. स्टॉफ, पंच, वजनमापधारक, फोटोग्राफरसह जावुन कायदेशिररित्या रेड केली असता नमुद महिलेच्या घरी (१) प्लॉस्टिक पिशवीमध्ये भरलेली वाळलेली हिरव्या रंगाची पाने, फुले, देठ बिया असी गांजा सदृश्य वनस्पती मिळुन आले. १) गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे वजन १ किलो १५७.५ ग्रॅम किंमत अं. १२,००० रू., २) नगदी ७५० रू. ३) एक स्टिलचे स्टॅपलर किं. अं.५० रू., ४) पॅकींगकरिता मोकळ्या छोट्या प्लॉस्टीक पिशव्या किं. ००.००/- रू., असा एकुण १२,८०० /- रू. चा माल मिळुन आल्याने नमुद दोन महिलांविरूद्ध सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.
आरोपी महिलेचे नाव-१) मुस्कान उर्फ स्नेहा उर्फ भारती सुरेश खैरे, वय ३३ वर्ष, धंदा मजुरी, रा. भिवापुर वार्ड, हनुमान मंदीरदजवळ चंद्रपुर
२) पुष्पा पांडुरंग बानलवार, वय ५५ वर्ष, धंदा मजुरी, रा. भिवापुर वार्ड, हनुमान मंदीरदजवळ चंद्रपुर यांच्यावर कलम 8(सी), 20(बी) (ii), 29 NDPS ACT अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुमक्का सुदर्शन सा. चंद्रपूर, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. ईश्वर कातकडे सा., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुधाकर यादव सा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक निशीकांत रामटेके पो.स्टे. चंद्रपूर शहर, स.पो.नि. राजेंद्र सोनवणे, पो.उप.नि. दत्तात्रय कोलटे, पो.उप.नि.विलास निकोडे, पोउपनि तृप्ती खंडाईत, म.पो. हवा. भावना रामटेके, पो.हवा. सचिन बोरकर, लक्ष्मण रामटेके, संजय धोटे, निकेश ढेंगे, जावेद सिद्धीकी, ना.पो.अ. कपूरचंद खरवार, पो.अ. विकम मेश्राम, रूपेश पराते, निलेश ढोक, योगेश पिदुरकर, म.पो.अ. सारीका गौरकार, दिपीका झिंगरे यांनी केलेली आहे. पुढील तपास पो.उप.नि. विलास निकोडे, पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर करित आहे.