बाईक चोरांची टोळी चंद्रपुर शहर पोलीसांच्या ताब्यात

चंद्रपूर शहरात बाईक चोरींचा प्रमाण फार वाढलेला आहे. अशीच एक बाईक चोरांची टोळीला चंद्रपूर शहर थाने यांनी ताब्यात घेतली आहे. सदर गुन्हयांचे आरोपी १) कार्तीक राजु खंडाळे वय 24 वर्षे 2 ) कुनाल यशवंत गर्गेलवार वय 38 वर्षे 3) चंद्रकांत उर्फ पप्पु मेजर वामनराव मानमोडे वय 43 वर्षे तिन्ही रा. विठ्ठलमंदीर वार्ड चंद्रपुर यांना मुखबीर च्या माहीती वरून ताब्यात घेवुन गुन्ह्यासंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी वरील तिन्ही गुन्हा केल्याची कबुली दिल्या वरूण त्यांच्या ताब्यातुन दोन पल्सर गाड्या 1,30,000/ रूपये जप्त करण्यात आले व बुलेट मो.सा. क. एम. एच. 34- ए.यु. 6725 किंमत 80,000/रुपये हि पठानपुरा मशान घटजवळील झुळपात लपवुण ठेवल्याचे सांगीतले वरुण त्या ठिकानी आरोपी व पोस्टाफ सह जावुन शाध घेतला असता सदरचे वाहन मिळूण आले नाही. तेव्हा सदरचे बुलेट मो.सा. क्र. एम.एच. 34- ए.यु. 6725 हि. वाहन आरोपीतांनी ज्या ठिकानी ठेवली होती त्या ठिकानवरुण स्थ. गु.शा. चंद्रपुर चे अमलदार यांनी ताब्यात घेतले. असे तीन वाहन चोरी चे गुन्हे पोस्टे चंद्रपुर शहर येथील गुन्हे शोध पथकाकडुण गुन्हे उघडकीस आणुन आरोपी कडुण दोन पल्सर मोटार सायकल व एक बुलेट मोटार सायकल असा एकुन 2,10,000 /रुपये चा मुद्देमाल जप्त करून गुन्हे उघडकीस आणुन आरोपीतास ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री रविद्रसिंग परदेशी सा. मा.अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु सा.. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर नंदनवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री सुधाकर अंभोरे सा. यांचे नेतृत्वत खली गुन्हे शोध पथकातील स.पो.नी. जयप्रकाश निर्मल, व त्यांचे पथक पो.हवा. महेंद्र बेसरकर, विलास निकोडे, नापोकों जयंता चुनारकर, सचीन बोरकर, चेतन गज्जलवार, पोअ. ईम्रान खान, दिलीप कुसराम, रूपेश रनदिवे, इर्शाद खान, यांनी केली आहे.
सदर गुन्हयाचे पुढील तपास अनुक्रमे पोहवा महेंद्र बेसरकर नापोका सचीन बोरकर नापोका चेतन गंज्जलवार पोस्टे चंद्रपुर शहर हे करीत आहे.