ईव्हीएम मशीन च्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भारत मुक्ती मोर्चाची धडक रैली
विविध संघटने सह हजारो नागरिक उतरले रस्त्यावर

यवतमाळ: दिनांक – १६ जानेवारी २०२४ रोजी EVM मशिन च्या विरोधात आजाद मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ येथे रैली काढून आंदोलन करण्यात आले. भारत मुक्ती मोर्चा द्वारे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन(EVM) च्या विरोधामध्ये केंद्रीय निवडणूक आयोगावर दिल्ली येथे विशाल महामोर्चाच्या तयारी अंतर्गत मा.वामन मेश्राम (राष्ट्रीय अध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा नवी दिल्ली) यांच्या नेतृत्वात चार चरणबद्ध आंदोलन करण्याचे नियोजित केले आहे. त्यामध्ये 5 जानेवारी 2024 ला 567 जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन देण्यात आले. आजचा तिसरा चरण 16 जानेवारी 2024 ला 567 जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर रैली प्रदर्शन च्या निमित्ताने आज येथे रैली प्रदर्शन करण्यात आले. टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स असणाऱ्या देशांमध्ये EVM नाही,भारतामध्ये साडेतीन टक्के अल्पसंख्यांक ब्राह्मणांच्या घसरती जनसंख्या च्या पार्टीला ईव्हीएम ने मदत केलेली आहे, 8 ऑक्टोबर 2013 चा सुप्रीम कोर्टाचा जजमेंट आहे की ईव्हीएम मध्ये पारदर्शक निवडणूक होत नाही, आयोगाच्या द्वारे जुन्या मशीन यांचा उपयोग 2014 मध्ये व्ही व्ही पी ए टी मशीन चा फक्त 0.33% उपयोग केला याचा अर्थ काय समजायचा? , 2014 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जो घोटाळा झाला त्याचे पुरावे, निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये बामसेफ या संघटनेने कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ची केस जिंकून व्ही व्ही पी ए टी मशीन लावण्यासाठी भाग पाडले, निवडणूक आयोगाद्वारे नवीन नियम 56सी, 56 डी, 49 एम ए लावण्याचे षडयंत्र, 2019 ची लोकसभा निवडणूक हा बीजेपीचा सर्वात मोठा घोटाळा, लोकसभा निवडणूकमध्ये मशीन मधून निघणाऱ्या पर्चा चुनाव आयोगाने चार महिन्यांमध्ये नष्ट का केल्या? बीजेपीच्या माध्यमातून करोडो रुपयाचा खर्च लोकसभा निवडणुकीवर कुठून केला ते काळेधन कुठून आलं? निवडणूक आयोगाला 112 लोकांनी ईव्हीएम तथा निवडणुकी संदर्भात प्रश्न विचारले त्यांचे उत्तर आतापर्यंत निवडणूक आयोगाने का दिले नाही?, 20 लाख ईव्हीएम मशीनचा मिसिंग मामला,जर ईव्हीएम मशीनला पेंटेंट नसेल तर त्यावर विश्वास कसा ठेवायचा? अशा अनेक ईव्हीएम च्या संदर्भामध्ये अविश्वासनीय बाबीला उघड करुन हे आंदोलन होत आहे. इत्यादी बाबींवर व येणाऱ्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच झाल्या पाहिजेत अशा प्रकारचे मत व्यक्त केले. विजयराज सेगेकर प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय गुरू रविदास क्रांती मोर्चा व जिल्हा अध्यक्ष सुनिल गवई, राष्ट्रिय मुल निवासी महिला संघाचे राष्ट्रीय अध्यक्षा कुंदाताई तोडकर ,सारिका भगत(राष्ट्रीय महासचिव बहुजन मुक्ती पार्टी),राजू फुलुके(तालुका अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा),मा प्रशांत मुनेश्वर प्रदेश अध्यक्ष भारतीय बेरोजगार मोर्चा , विलास भोयर,संदीप मून, भारत मुक्ति मोर्चा,मा ओमप्रकाश कांबळे जिल्हा अध्यक्ष दिव्यांग संघर्ष समिती यवतमाळ, बहुजन क्रांती मोर्चा,छत्रपती क्रांती सेना,राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ,भारतीय युवा,विद्द्यार्थी, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, इतर बहुजन संघटना या मोर्चा मध्ये सहभागी झाले होते व बहुसंख्य बहुजन समाज बांधव उपस्थित होते. रॅली आंदोलनाला यशस्वीते करिता मा. प्रशांत ठमके जिल्हा संयोजक बहुजन क्रांती मोर्चा,मा ऍड अनिल किनाके बहुजन मुक्ती पार्टी, राजु फुल्लुके, युवराज आडे, राजेश भुजाडे, संदीप मुन, विलास भोयर, ज्योती वासनिक, प्रज्ञा मोखाडे, प्रकाश वावरे, गजानन परडके, प्रफुल बोदडे, सुखलाल देशपांडे,मा जानराव पेदाम, मा गजानन परडखे प्रमोद कांबळे, राजू राजगुरे ,हिम्मत आत्राम ,विजूभाऊ पेटकुले यांनी साथ सहयोग दिला.