सावली तालुक्यात रेती तस्करी जोमात तर महसूल प्रशासन कोमात

सावली तालुक्यातील साखरी, बोरमाळा. रेती घाटांपैकी समदा रेती घाटांचे लिलाव झाला . मात्र, बोरमाळा .साखरी कापशी उपरी या रेती घाटांवरून सर्रासपणे रेतीचा उपसा सुरू आहे. तालुक्यात सध्या रेतीचे दर गगनाला भिडले असून घरकुल च्या बांधकामा करिता रेतीचा प्रश्न आ वासून उभा आहे सध्या एक ट्रॅक्टर रेतीचे दर ८ हजार रुपये सुरू आहे एकाच. घाटांचे लिलाव झाले असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात या सोनापूर कापशी उपरी डोनाळा हरंबा उसेगाव घाटावरून रेतीची वाहतूक सुरू आहे. सामदा घाट नुकताच लिलाव झाल्यामुळे त्यामुळे ही रेती कुठल्या घाटावरून येत आहे हे मात्र समजण्यापलीकडे आहे. तालुक्यात रेतीची तस्करी जाेमात तर महसूल प्रशासन कोमात असल्याने शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.
रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण!
सावली तालुक्यात सध्या रेतीची तस्करी जोरात असून यातून अनेक तस्कर गब्बर झाले असून, ते सबकुछ मॅनेज है ची भाषा करीत आहे. रेती घाटावरून रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी रेती तस्करांनीच वेळा देखील ठरविल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असून जिल्हा खनिकर्म विभागाकडून केवळ बघ्याची भूमिका स्वीकारली असल्याने रेती तस्करांच्या मुसक्या आवळणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दखल घेणार कोण?- रेती तस्करीत राजकारणाशी संबंधित काही जण रेती तस्करीत सहभागी असल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. तर या सर्व प्रकाराची दखल घेऊन कारवाई करणार कोण? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
कारवाई करताच वरिष्ठांचे फोन – रेतीची तस्करी करताना वाहने पकडणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे वरिष्ठ अधिकारीच तो आपला माणूस आहे, कारवाई करू नका असे सांगून कारवाई न करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांचा सुद्धा पर्याय नसतो. यापूर्वी असा प्रकार एका तालुक्यात घडला. यासाठी थेट जिल्हा खनिकर्म विभागातून फोन आल्याची माहिती लवकर चर्चेतून पुढे आली आहे
रेती तस्कर म्हणतात सबकुछ मॅनेज है- मागील तीन-चार महिन्यांपासून सावली तालुक्यात रेतीची तस्करी जोरात सुरू आहे. त्यामुळे रेती तस्कर चांगले मालामाल झाले असून, त्यांच्याकडील वाहनांची संख्यादेखील दुप्पट झाली आहे. तर त्यांच्यावर कुठलीच कारवाई होत नसल्याने रेतीची तस्करी सुरळीत आहे. त्यामुळे ते छातीठोकपणे सबकुथ मॅनेज असल्याचे सांगत आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या रेती तस्करी मागे आंतरराज्य तस्कर तर नाही ना या बाबीचा सुद्धा उलगडा होणे आवश्यक आहे
लिलाव झालेल्या घाटाची चौकशी मा जिल्हा अधिकारी चंद्रपुर आणी जिल्हा खनन अधिकारी कार्यलय चंद्रपुर किती ब्रास उचल करने आणी दिशा कोणती आहे तसेच मौका अधिकारी त्वरित नियुक्ति करुन रेती ऊचल करते वेळी सरळ आन लाईन विडीया प्रेक्षपण करावे सावली तालुक्यातिल बोरमाळा घाट,सामदा घाट ची रेती ऊचल करणारे वाहन चे नबंर नोद करुन फोटो आणी विडीयो बनवावे या करिता तहसीलदार आणी नायब तहसीलदार ची नेमनुक करावे या करीता भारतीय आँल मिडीया सुरक्षा फोरम आँफ इंडीया चे शिष्ट मंडळ त्वरित मा जिल्हा अधिकारी चंद्रपुर तसेच ईतर अधिकारी यांना संपुर्ण पुरावे सादर करतील