मोटर सायकल चोर शहर पोलिसांच्या ताब्यात

दिनांक १३ / १२ / २२ ला नामे विशाल किशोर मंचलवार वय २१ जलनगर वार्ड, चंद्रपुर यांनी पो ठाणे चंद्रपुर शहर येथे रिपोर्ट दिली होती की दि. १२.१२.२०२२ रोजी सकाळी ०८.०० वा चे सुमारास एस पी कॉलेज चे मेन गेट चे बाजुला रोड वर त्यांची मोसा फॅशन प्रो के एम एच ३४ ए डब्ल्यु ९२५७ ही पार्क करुन ठेवली असता कोणीतरी अज्ञात इसमाणे चोरुन नेली अशा तोंडी रिपोर्ट शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली होती या रिपोर्ट ची दखल घेत गुन्हयाचे पुढील तपासामध्ये मुखबीर द्वारे माहिती प्राप्त करून अतीशय अल्पशा कालावधी मध्ये आरोपीला अटक करण्यात आले. आरोपी चे नामे मोहोम्मद रियाज शफीक शेख असून वय २३ वर्ष रा. नुरी चौक बगड खिडकी चंद्रपुर यांना गुन्हयात अटक करून त्यांचे कडुन पो स्टे चंद्रपुर शहर अभीलेखावरील अप क्र ६७७ / २२ कलम ३७९ भादवी व अप क्र ६७८ / २२ कलम ३७९ भादवी मधील चोरीस गेलेल्या दोन फॅशन प्रो मोसा किंमत अंदाजे ७०,०००/- रू चा माल जप्त केला असुन पुढील तपास नापाअ चैतन गज्जलवार पो स्टे चेंद्रपुर शहर करीत आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री रवींद्रकुमार परदेशी सा, मा. अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु मॅडम, मा. उपविभागीय पोलीस अधीकारी श्री सुधीर नंदनवार सा., मा. पोलीस निरीक्षक श्री सुधाकर अंभोरे सा. पोलीस ठाणे चंद्रपुर शहर यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक प्रमुख सपोनि श्री मंगेश भोंगाडे, पोहवा. शरीफ शेख, महेंद्र बेसरकर, विलास निकोड जयंत चुनारकर, नापोशि सचिन बोरकर, चेतन गज्जलवार, पो शि, रूपेश रणदिवे इम्रान खॉन, इरशाद शेख, दिलीप कुसराम यांनी केली आहे.