अल्पसंख्यांक योजनेअंतर्गत रद्द केलेले प्रीमॅट्रीक स्कॉलरशिप अर्ज तत्काळ मंजूर करण्यात यावे
भारतीय ऑल मिडीया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया ची मंगणी

चंद्रपूर:- आज तारिख ३०/११/२०२२ रोजी भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया तर्फे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिला परिषद चंद्रपूर यांना निवेदन सादर करून राज्यातील जवळपास दहा लाख अल्पसंख्यांक योजनेअंतर्गत मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, शिख धर्मातील पहिली ते आठवी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून शिष्यवृत्ती फार्म भरून घेण्यात आले आहेत पण शासन स्तरावर ते अमान्य करून रद्द करण्यात आले आहेत. ते सर्व अर्ज तत्काळ मंजूर करण्यात यावे या करिता फोरम चे केंद्रीय अध्यक्ष अय्युब भाई कच्छी यांचा आदेशानुसार व फोरम राष्ट्रीय अध्यक्ष युथ विभाग अर्शद कच्छी जी यांच्या नेतृत्वात व फोरम चे केंद्रीय प्रसिध्दी प्रमुख शोएब कच्छी यांच्या उपस्थित निवेदन सादर करण्यात आले.
फक्त चंद्रपूर जिल्ह्यात नव्हे तर भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया या संघटनेच्या जालना जिल्ह्यातील पदाधिकारी सदस्या तर्फे या प्रमुख विषयावर निवेदन सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातील पदाधिकारी तथा सदस्या नी या विषयावर आप आपल्या शेत्रातील जिल्हा परिषदेत निवेदन सादर केले.
केंद्र सरकार द्वारा अल्पसंख्यांक वर अन्याय करण्याचा हा धोरण आहे. अल्पसंख्यांक नागरिकांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कार्य केंद्र सरकार करीत आहे. पण भारतीय ऑल मिडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया अल्पसंख्यांक वर होणार अन्याय कधीच सहन करणार नाही. व केंद्र सरकारने तत्काळ सर्व प्रिमट्रिक स्कॉलरशिप चे अर्ज मंजूर करावे अन्यथा फोरम तर्फे तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी फोरम चे केंद्रीय अध्यक्ष अय्युब भाई कच्छी जी यांनी दिला.
यावेळी फोरम चे केंद्रीय अध्यक्ष अय्युब भाई कच्छी, युथ विभागाचे केंद्रीय अध्यक्ष अर्शद कच्छी, केंद्रीय प्रसिद्धी प्रमुख शोएब कच्छी तथा अन्य पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.