देसी कट्टा घेऊन फिरणारा राजुरा पोलिसांच्या ताब्यात

दिनांक २७/१०/२०२२ रोजी पो.स्टॉफ सह आर्म ॲक्ट कामी पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय बातमीदाराकडून माहीती मिळाली की, एक इसम डोक्याला पगडी बांधलेला इसम न्यु व्हेरा इंग्लीस हायस्कुल चे बाजुला कमरोला बनावटी देशी कट्टा बाळगुन फिरत आहे अशा माहीतीवरून सदर ठिकाणी सापळा रचून घेराव करून सदर इसमास ताब्यात घेवून अंगझडती घेतली असता आरोपी नामे लबज्योतसिंग हरदेवसिंग देवल वय १९ वर्ष रा. सोमनाथपुरा वार्ड राजुरा याचे कडून एक गावटी बनावटी देशी कटट्टा व ४ जिवंत काडतुस किंमत १२,०००/रू चा मुद्येमाल कलम ३,२५ भारतीय मिळून आल्याने सदर आरोपी विरूध्द अप.क. ४३४/२०२२ हत्यार कायदा सहकलम १३५ मु.पो.का अन्वये कार्यवाही करण्यात आली.
सदरची कार्यवाही मा. उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा श्री पवार सा. यांचे नेत्रुत्वात ठाणेदार श्री संतोष दरेकर यांचे मार्गदर्शनात पथकातील सफौ, खुशाल टेकाम पो.हवा. रविंद्र नक्कनवार,पो.हवा .किशोर तुमराम, पो. शि. महेश बोलगोडवार, पोशि, संदिप बुरडकर, पोशि. तिरूपती जाधव यांनी केली.