जनता महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचा राज्यव्यापी संपात सहभाग

महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृति समितिच्या निर्देशानुसार राज्यातील अकृषि विद्यापीठे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या विविध टप्प्यात सुरु असलेल्या राज्यव्यापी आंदोलनाच्या चवथ्या टप्प्यात आज दिनांक १६ फेब्रुवारीला एक दिवसीय राज्यव्यापी बंद आंदोलनात चंद्रपुर गढ़चिरोली जिल्हा महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटने अंतर्गत संलग्नित जनता महाविद्यालय चंद्रपुर येथिल संपुर्ण शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेवुन संप यशस्वी केला.
मागण्या – १) कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगति योजना पुनर्जिवित करणे २) कर्मच्याऱ्यांना १०/२०/३० लाभाची योजना शिक्षकेत्तर व विद्यापीठीय कर्मच्याऱ्यांना लागु करणे ३) जुनी पेंशन योजना लागू करणे ४) सातव्या वेतन आयोग फरकाची थकबाकी ई. अनेक मागण्यांना घेवून हा संप पुकारन्यात आला असुन मागण्या मान्य न झाल्यास २०फेब्रुवारी २०२३ पासुन बेमुदत संप होणार आहे.
या एकदिवसीय राज्यव्यापी संपात जनता महाविद्यालय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मा. सुर्यभान कन्नाके, सचिव विवेक आवळे,जिल्हाध्यक्ष प्रशांत रंदई व प्रबंधक दिनकर अडबाले यांनी स्वराज्याचे जनक छत्रपति शिवाजी महाराज व राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कर्मच्याऱ्यांच्या संविधानिक मागण्या राज्य शासनाकडुन मान्य करुन घेण्यात येतील,या विश्वासासह या संपात सहभागाची घोषणा केली.या वेळी जनता महाविद्यालय शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुर्यभान कन्नाके यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत रंदई व कृति समितितील सदस्य सचिन सुरवाडे, सभासद नरसिम्हा वादावत, निर्दोष दहिवले, नंदकिशोर पाहुणे, नंदकिशोर निखार, अधिक्षक अरविंद धांदे,जयेश बेले,ॠशांत टिपले,विप्रा पाटिल यांनी सभेसमोर मनोगत व्यक्त करित विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
या संपाच्या ठिकानी MFUCTO महाराष्ट्र संघटनेचे प्रा.प्रेमदास बोरकर,प्रा.मनुरे व
प्रा.योगेश्वर दुधपचारे यांनी भेट देवून कर्मच्याऱ्यांना मार्गदर्शन केले व आपल्या संघटनेचा पाठींबा या संपाला जाहिर केला.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम् सुभाष सर यांनी कर्मच्याऱ्यांना भेट देत संपास प्रिंसिपल फोरमचा पाठिंबा जाहिर केला. तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॅ आशिष महातळे व सौ.कविता रंगारी व महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी कर्मच्या-यांची भेट घेतली.दोन तास चाललेल्या या संप सभेचे संचालन श्रीमती योगिता रायपूरे व श्री विवेक आवळे यांनी केले तर आभार अरुण भुसारी व नंदकिशोर पाहुणे यांनी केले.
महाविद्यालयातील सर्व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी वेधक घोषणा देत या संपाकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा यशस्वी प्रयत्न केला.