शासनाची दिशाभुल करुन शासकिय कागदपत्रात खोडतोड करुन, जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करुन शासकिय नौकरी व त्यासोबतच मिळणा-या सोयी सुविधांचा उपभोग घेत असणा-या हमंद बहिणींवर कारवाई कधी ? राहुल कुकडपवार यांचा सवाल

चंद्रपूर जिल्ह्यातील, कु. दिपा रमेशचंद्र हमंद (सध्या कार्यरत अंगणवाडी पर्यवेक्षिका, चिचपल्ली क्षेत्र, चंद्रपूर) व कु. शुभांगी रमेशचंद्र हमंद (सध्या कार्यरत प्राथमिक शिक्षीका, शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, बोर्डा, चंद्रपूर) या दोघीही सख्या बहिणीं असुन त्या दोघींनीही शासकीय कागदपत्रात खोडतोड करुन, जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करुन, शासकिय नौकरी व त्यासोबतच मिळणा-या सोयी सुविधांचा उपभोग घेत असल्याचे प्रकरण राहुल कुकडपवार यांनी जिल्हा प्रशासनाकडे सबळ पुराव्यासहित उघडकीस आणलेले आहे. तरी या दोन्हीही हमंद बहीणींवर कार्यवाही कधी असा सवाल राहुल कुकडपवार यांनी जिल्हा प्रशासनाला केला आहे.
वास्तविक पाहता, या दोन्हीही सख्या हमंद बहिणी मुळच्या जातीने वंजारी असुन, त्यांनी मुळ शासकीय कागदपत्रात खोडतोड करुन स्वत:ला बंजारा या जातीचे दाखवुन, शासकिय नौकरी व त्यासोबतच मिळत असणा-या सोयी सुविधांचा फायदा अत्यंत निर्लज्जपणे लाटलेला आहे, दोन्ही हमंद बहिणींनी केलेले हे कृत्य अत्यंत लज्जास्पद असुन त्या दोघीही अजुनही शासकिय सेवेत कर्तव्यावरआहेत ही एक प्रकारची विटंबणाच असुन शासनाचा नाकर्तेपणाच दर्शविते. म्हणूनच दोन्ही हमंद बहिणींवर पोलीस कारवाई करुन शासकीय सेवेतुन बडतर्फ करण्याची विनंती राहुल कुकडपवार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदना मार्फत केलेली आहे.
या उपरोक्त या दोन्हीही हमंद बहिणी जातीने वंजारी असतांना सुध्दा शासकिय कागदपत्रात खोडतोड करुन, स्वत:ला बंजारा या जातीचे दाखवुन, शासकिय नौकरी करित असतांना (नौकरी अजुनपावेतो सुरुच आहे), जेव्हा त्यांच्या त्यांच्या प्रकल्प कार्यालयाअंतर्गत जात वैधता प्रमाणपत्राची मागणी करण्यात आली. तेव्हा अतिशय तल्लख व फसवेगीरीत चाणाक्ष अश्या बहिणींनी मा. समाजकल्याण अधिकारी, समाजकल्याण कार्यालय,चंद्रपूर यांच्याकडे दोघींनीही बंजारा या जातीचे जात वैधता प्रमाणपत्र मिळावे म्हणुन दावा केला, परंतु तत्कालीन समाजकल्याण अधिकारी, चंद्रपूर यांना या दोन्ही बहिणींनी केलेली शासकिय कागदपत्रातील खोडतोड, दक्षता पथक समिती यांच्या चौकशीचा अहवाल व त्याच बरोबरच खोडतोड करुन वंजारीचे बंचारा केल्या गेलेले दिसते, मुळ जात वंजारीच आहे, असे बयाण देणा-या तत्कालीन मुख्याध्यापक यांची साक्ष (श्री. रमेशचंद्र सदाशिव हमंद, दोन्हीही हमंद बहिणींचे वडील यांच्या शाळा सोडण्याच्या दाखल्याबाबत) लक्षात घेवुन, दोन्हीही हमंद बहिणींचा बंजारा जातीचा दावा अवैध ठरविला होता.
तो दावा अवैध ठरविल्यावर दोन्ही हमंद बहिणींनी, मा. उच्च न्यायालय खंडपीठ, नागपूर येथे धाव घेतली व अत्यंत चाणाक्षपणे व फसवेगीरीने शासकिय कागदपत्रात केलेली खोडतोड मा. न्यायालयाच्या लक्षात येवु न देता, वाम मार्गाने, एका दिवासात, शासकिय नौकरीच्या बचावाचा स्थगनादेश मिळविला. परंतु मा. उच्च न्यायालयाने शासनस्तरावर कारवाई करण्यात यावी असे स्थगनादेशात स्पष्ट नमुद केलेले आहे.
जेव्हा राहुल कुकडपवार यांनी कु. दिपा रमेशचंद्र हमंद यांचे कार्यक्षेत्राशी संबंधित जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. भागवत जी. तांबे यांना विचारणा केली असता त्यांनी जाणीवपूर्वक पोलीस तक्रार करण्यास नकार दिला. वास्तविक पाहता शासकिय कागदपत्रात खोडतोड हा अतिशय गंभीर व अक्षम्य गुन्हा असुन सुध्दा मा. तांबे साहेब यांनी जाणीव पूर्वक कुठल्याही प्रकारची फौजदारी किंवा प्रशासकीय कार्यवाही करण्याचे टाळले. कागदपत्रात झालेली खोडतोड स्पष्टपणे दिसत असुनही, त्याबाबतची कुठल्याही प्रकारची कसलीही चौकशी संबंधित कार्यालयाशी न करण्याचा त्यांचा मार्मीक व उदात्त हेतु कोणता हे त्यांचे त्यांनाच ठाऊक व तसेच कु. शुभांगी रमेशचंद्र हमंद यांच्या कार्यक्षेत्राशी संबंधित, प्रकल्प अधिकारी, मा. श्री. विकास राचेलवार यांना विचारणा केली असता. त्यांनी ते प्रकरण नियुक्ती अधिकारी मा. श्री. रविंद्र ठाकरे यांच्याकडे वळविले व श्री. ठाकरे यांनी “हे प्रकरण सध्या माझ्या टारगेट आहे, व लवकरच मी तुम्हाला कळवेल” असे राहुल कुकडपवार यांना भ्रमणध्वनीव्दारे कळविले.
कु. शुभांगी रमेशचंद्र हमंद यांचे प्रकरणात या विषयालाच अनुसरून राहुल कुकडपवार यांनी माहितीच्या अधिकारात काही विषयांची माहिती मागितलेली असता, त्याच शाळेतील प्रभारी मुख्याध्यापक कु. जयश्री राऊत यांनी कसल्याही प्रकारची कुठलीही माहिती , माहितीच्या अधिकारात मागितली असुन सुध्दा, राहुल कुकडपवार यांनी आजपावेतो दिलीच नाही. याऊलट कु. शुभांगी रमेशचंद्र हमंद यांचेशी संगनमत करुन राहुल कुकडपवार यांच्या विरुध्द अनेक वेळा खोट्यानाट्या पोलीस तक्रारी दाखल करण्याचा प्रयत्न करुन त्यांना खुप जास्त प्रमाणात मानसिक त्रास दिला आहे व कु. जयश्री राऊत या प्रसार माध्यमांनासुध्दा राहुल कुकडपवार यांच्या विरुध्द खोटे-नाटे बयाणबाजी करीत असतात.
हे कमी होते की काय, म्हणुनच कु. शुभांगी रमेशचंद्र हमंद यांचेशी अत्यंत अत्यंत निकटवर्तीय व तसेच अतिशय सुमधूर व घनिष्ठ संबंधात असेलेले त्याच शाळेवर कार्यरत असलेले पुरुष अधिक्षक धनेश पोटदुखे याने तर राहुल कुकडपवार यांना “आमच्या शाळेतील सर्व कर्मचारी ग्रुपने पोलीस तक्रारी करुन तुला बरबाद करुन टाकु, तु हे प्रकरण उघडकीस आणु नको” असे धमकावीले, एवढ्यावरच न थांबता धनेश पोटदुखे यांना कु. हमंद यांच्या सोबत असलेल्या घनिष्ठ व सुमधूर संबंधामुळे राहुल कुकडपवार यांचे घरी रात्री 11:30 वाजता मद्यधुंद अवस्थेत पोलीस असल्याची बतावणी करणारे दोन इसम धाडले व त्यांना धमकावुन या प्रकरणापासुन विचलीत करण्याचा प्रयत्न केला.
एकंदरीत या प्रकरणात राहुल कुकडपवार यांना भविष्यात पुरुष अधिक्षक धनेश पोटदुखे याचेकडुन जिवीतास धोका निर्माण होवु शकतो असे म्हणण्यास काहिही हरकत नाही, तरी सुध्दा राहुल कुकडपवार यांच्या जिवीतास पुढे मागे काहीही झाल्यास त्याची संपुर्ण जबाबदारी कु. शुभांगी रमेशचंद्र हमंद, त्यांचे अत्यंत निकटवर्तीय व अतिशय सुमधूर व घनिष्ठ संबंधात असलेले पुरुष अधिक्षक धनेश पोटदुखे व तसेच प्रभारी मुख्याध्यापक कु. जयश्री राऊत सोबत कु. दिपा रमेशचंद्र हमंद यांचेवर पुर्णपणे राहील असे राहुल कुडपवार यांनी या पत्रकाव्दारे जाहीर केलेले आहे. सदर कु. दिपा रमेशचंद्र हमंद (सध्या कार्यरत अंगणवाडी पर्यवेक्षिका, चिचपल्ली क्षेत्र, चंद्रपूर) व कु. शुभांगी रमेशचंद्र हमंद (सध्या कार्यरत प्राथमिक शिक्षीका, शासकिय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा, बोर्डा, चंद्रपूर) यांनी शासनाची दिशाभुल करुन, शासकिय कागदपत्राची खोडतोड करुन जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करुन, आजपावेतो कर्तव्ये बजावत आहेत, ही एक गांभीर्याची बाब आहे व तसेच यावरुन असे निदर्शनास येते की, या दोन्ही बहिणींची कृती शासनाची प्रतिमा जनमानसात मलीन करणारी आहे. या दोन्ही बहिणींनी अक्षम्य गुन्हा केलेला आहे तरी यांचेवर शासनाच्या नियमानुसार शिस्तभंगाची कारवाई करुन, शासकिय सेवेतुन बडतर्फ करुन, तुरुंगाची वाट दाखवावी, असे निवेदन राहुल कुकडपवार ह्यांनी ज़िल्हाधिकाऱ्यांना देऊन, सत्याची बाजू पुराव्यासहित मांडून लवकरात लवकर कारवाईची करण्याची मागणी निवेदना मार्फत केलेली आहे.