दहावी ते पदवीधर उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्ण संधी
... या तारखेला पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

चंद्रपूर( का. प्र) जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, व सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता सरदार पटेल महाविद्यालय येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यातून एक हजारहून अधिक विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. मेळाव्यात राज्यातील नामांकित खाजगी व औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या थेट सहभाग घेणार आहेत. दहावी, बारावी, आय.टी.आय, पदविका, पदवीधारक यांसाठी योग्यतेनुसार विविध रिक्त पदांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे.
रोजगार देणाऱ्या प्रमुख कंपन्या : ओमॅट वेस्ट प्रा.लि., एशियन सोलर प्रा.लि., महाराष्ट्र कार्बन प्रा.लि., गोपानी आयर्न अँड पॉवर इंडिया प्रा.लि., भावना एनर्जी, डेक्सॉन इंजिनिअरिंग (नागपूर), सनफायर सिल्ड, ताज बेव्हरेज, वैभव इंटरप्रायझेस (नागपूर), विदर्भ क्लिक 1 सोल्युशन, जे. पी. असोसिएट अँड लॅबोरेटरीज, बोर्डवाला कोचिंग इन्स्टिट्यूट, डी.एन.ए. नीट अकॅडमी, संसुर सृष्टी इंडिया, भारत पे, एस.बी.आय. लाईफ, एल.आय.सी. ऑफ इंडिया आदी.
उमेदवारांनी सोबत आणावयाची कागदपत्रे व प्रक्रिया : आधार कार्ड, शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे (कमीत कमी 3 प्रती) पासपोर्ट साइज फोटो. उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर लॉगिन करून आपली शैक्षणिक पात्रतेनुसार ‘पंडित दिनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’ या पर्यायावर रिक्त पदांकरिता ऑनलाईन अर्ज करावा. इच्छुक नियोक्ते/कंपन्यांनीसुद्धा याच पोर्टलवर रिक्तपदे अधिसूचित करावीत, या प्रमाणे नोंदणी प्रक्रिया पर्ण करावी.
येथे करा संपर्क : अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172–252295 वर संपर्क करावा व जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त अ.ला. तडवी यांनी केले आहे.