google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

साप्ता. खरे सव्वाशेर विशेषांकाचे मोठ्या दिमाखात प्रकाशन संपन्न

छोटे वर्तमानपत्र संपादकांनी एकत्र येण्याची नितांत गरज - शौकतभाई शेख

श्रीरामपूर प्रतिनिधी: संगमनेर येथील लियाकतखान पठाण संपादित साप्ताहिक खरे सव्वाशेर या वर्तमानपत्राने आजवर अनेक बाबी स्पष्ट आणी सडेतोड लिखाण करत विविध ठिकाणी शासकीय, निमशासकीय कार्यालयातील गैरकारभाराला वाचा फोडण्याची मोठी कामगीरी बजावलेली आहे,गेल्या २३ वर्षांपासून त्यांची ही सत्य बातमीरुपी सेवा सातत्याने कार्यरत असुन पुर्वी १८+२३ साईज अंकात प्रकाशित होणारे हे साप्ताहिक वृत्तपत्र यापुढे २२+३२ अशा दैनिक वर्तमानपत्राच्या अकारात आज बुद्ध पौर्णिमेच्या शुभ दिनी प्रकाशित झाल्याचा मोठा आनंद होत असल्याचे स्वाभिमानी संपादक सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख म्हणाले.

श्रीरामपूर येथील स्वाभिमानी संपादक सेवा संघाच्या प्रमुख कार्यालयात झालेल्या या विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
व्यासपीठावर स्वाभिमानी संपादक सेवा संघ संचलित इलेक्ट्रॉनिक ॲंड प्रिंट मिडिया सेलचे प्रदेशाध्यक्ष असलमभाई बिनसाद,समता फाऊंडेशन चे ऍड.मोहसिन शौकत शेख,संपादक लियाकतखान पठाण, कार्यकारी संपादक तौसिफ लियकतखान पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना श्री.शेख म्हणाले की सध्या वृत्तपत्र क्षेत्रात मोठ्या कमालीची स्पर्धा निर्माण झाली असल्याची बघावयास मिळते आहे, त्यात इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनी देखील मोठी प्रगती केली असल्याचे दिसून येते, परंतु या स्पर्धेच्या युगात एका साप्ताहिकाने आपले सातत्य टिकवून ठेवावे ही मोठी कसरत आणी धाडसाचं कार्य होय, कारण साप्ताहिक म्हटल्यास शोध पत्रकारितेच्या माध्यमातून पत्रकारिता करावी लागते,”जो न देखे रवी वो देखे कवी” याप्रमाणे साप्ताहिकाची एक वेगळी प्रतिमा असते म्हणून सखोल अभ्यासपुर्वक सत्य बातम्या आणी ज्वलंत विषय हाताळण्यात साप्ताहिकांचा सिहांचा वाटा असतो हे नाकारून चालणार नाही,
करीता अशी शोध पत्रकारिता करत आपल्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जनतेसमोर सत्य मांडत असताना प्रत्येक बातमीमागे शत्रुत्व निर्माण होते,मात्र “सत्यासाठी झगडताना कर्तव्याशी प्रामाणिक राहिले पाहिजे” या म्हणी प्रमाणे साप्ताहिक वर्तमानपत्र चालवावी लागतात, त्यावर अशा सत्य बातम्यांमुळे अवैध व्यावसायिकांची धाबे दणाणली जावून कधी काळी साप्ताहिकाच्या संपादकांवर कटू प्रसंग उदभल्याचे असे अनेक उदाहरणे आहेत, मग अशावेळी त्यांच्या मदतीला पुढे कोणीच येत आहे ही केवळ वास्तविकताच नसून मोठी शोकांतिका आहे, याकरीता छोट्या वर्तमानपत्र प्रसार माध्यमांचे आपल्या हक्काचे मजबूत संघटन होणे अत्यंत गरजेचे आहे, करीता छोट्या इलेक्ट्रॉनिक आणी प्रिंट मिडिया क्षेत्रातील प्रसार माध्यमांच्या संपादकांनी एकत्र येण्याची नितांत गरज असल्याचे ते म्हणाले. याकरीता स्वाभिमानी संपादक सेवा संघ सदैव नवोदित संपादक, पत्रकारांच्या सेवेत आहे ज्या कोणास वाटेल त्यांनी संघटनेसोबत स्वतः स देखील सक्षम करणेकामी पुढाकार घ्यावा असेही शेवटी ते म्हणाले.
या प्रसंगी असलम बिनसाद, ऍड.मोहसिन शेख, मुश्ताक तांबोळी,सलिम कादर शेख, सोमनाथ जानराव, निखिल गजे आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी माहिती व कायदा च्या कार्य.संपादिका विजयाताई बारसे, मुश्ताकभाई तांबोळी,
संपादक शब्बीर उस्मान शेख, जावेद सलिम शेख, अफजल मेमन,सरताज शेख,
रज्जाकभाई पटेल,विजय वाहुळ, इनायत अत्तार, असलमभाई शेख, रमेश शिरसाठ,रविंद्र खामकर, अशोक बढे, आदि मान्यवर उपस्थित होते. संपादक लियाकतखान पठाण यांनी स्वागत तर ,सुत्रसंचलन ऍड. मोहसिन शेख यांनी व शेवटी तौसिफ पठाण यांनी आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Download Aadvaith Global App