शरद पोंक्षे यांनी हिंदूंची जाहीर माफी मागावी महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांची मागणी

चंद्रपूर- १४ आगस्ट च्या डोंबिवली येथील सभेमध्ये अभिनेता शरद पोंक्षे यांनी हिंदूंना नंपुसक म्हणून हिनवले. हिंदू धर्माच्या धर्म शास्त्रांमध्ये हिंदू धर्मात अहिंसेचा मार्ग परम धर्म मानला आहे पण पोंक्षे याने हिंदूं नी शस्त्र हातात घेणे आवश्यक आहे असे विधान करून या सभेतील लोकांना चिथवण्याचा प्रयत्न केला. या मुळे समाजात तेढ निर्माण होऊन हिंसाचार होऊ शकतो.
हा शरद पोंक्षे नेहमीच गांधी विरोधी विधान करतो कारण याने एक नाटक केले होते. ” मी नथुराम गोडसे बोलतो” या नाटकाच्या आधारे याची दुकानदारी चालायची पण आता त्याला भूमिका मिळणेही कठीण झाले आहे . म्हणून गांधी विरोधात बोलून प्रकाश झोतात कसे येता येईल असा केविलवाणा प्रयत्न पोंक्षे यांच्याकडून केला जात आहे असा आरोप महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी केला आहे.
अभिनेता शरद पोंक्षे यांनी ताबडतोब सर्व हिंदू ची माफी मागावी अन्यथा हा जिथे महिला काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांना दिसेल तेव्हा तिथेच त्याचा करेक्ट कार्यक्रम महिला काँग्रेस कडून केला जाईल असा इशारा महिला काँग्रेस च्या प्रदेश अध्यक्षा संध्या सव्वालाखे व महिला काँग्रेस च्या जिल्हाअध्यक्षा नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी दिला आहे.