शासनाची दिशाभूल करून जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरीचा उपभोग – राहुल कुकडपवार यांचा आरोप

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यात कु दीपा रमेशचंद्र हमंद यांनी शासनाची दिशाभूल करून खोटे प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरीचा उपभोग घेत असल्याचं प्रकरण राहुल कुकडपावार यांची उघडकीस केला आहे.
सविस्तर वृत्त असे की कु दीपा रमेशचंद्र हमंद ह्या जातीने वंजारी असून त्यांनी शासकिय कागदपत्रात खोडतोड करून स्वतःला जातीने बंजारा दाखवून शासकीय सेवेत अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हनून नोकरी नोकरी बळकावली आहे.
परंतु वास्तविक पाहता कू. दीपा रमेशचंद्र हमंद यांचे वडील रमेशचंद्र सदाशिव हमंद हे जातीने मूळचे वंजारी असून त्यांचे महात्मा गांदी नगर परिषद प्रा. शाळा चंद्रपूर येथून काढलेल्या दखल – खारीज रजिस्टरच्या छायांकित प्रतीतसुद्धा वंजारी ही जात नमूद आहे. तसेच त्याकाळच्या तत्कालीन मुख्याध्यापकांनी प्रमाणित करण्यात येते की वर नमूद उमेदवार यांचे मूळ दाखल खारीज रजिस्टर नुसार जात ही वंजारी आहे सादर दाखल खारीज रजिस्टरमध्ये कोणतेही खिळतोड नसून शाईत बदल नाही असे स्पष्टपणे नमूद केले आहे.
विशेष म्हणजे कू दीपा रमेशचंद्र हमंद यांचे जात वैद्यता प्रमाणपत्र समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण कार्यालय चंद्रपूर यांनी नाकारले असून त्यात दक्षता पथक समितीच्या अहवालात सुद्धा तत्कालीन मुख्याध्यापकांनी व चा ब केलेला दिसतो अशी साक्ष देऊन त्या आपल्या साक्षिवर समिती समोर सुध्दा कायम राहिल्या आहेत. व तसेच समितीच्या अहवालात अर्जदार बंजारा समाज नसल्याचे व त्यांची मूळ जात वंजारी असल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले आहे.
तरी या प्रकरणात राहुल कूकडपवार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून शासकीय कागदपत्रात खोळतोड करून मूळचे वंजारी असून स्वतःला बंजारा असे भासवून शासकीय नोकरी व त्यासोबतच मिळणाऱ्या सवलतींचा उपभोग घेणाऱ्या ब तसेच शासनास दिशाभूल करणाऱ्या कू दीपा रमेशचंद्र हमंद यांचेवर फौजदारी व प्रशासकीय कार्यवाही करून त्यांना शासकीय सेवेतून लवकरात लवकर बडतर्फ करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.