मा. आमदार सुभाषभाऊ धोटे, राजुरा विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते राष्ट्रीय पॅलिएटीव्ह केअर दिनाच्या सप्ताहाचे उदघाटन संपन्न

दिनांक १०/१०/२०२३ रोजी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, उप जिल्हा रुग्णालय, राजुरा अंतर्गत पॅलिटीव्ह केअर कार्यक्रम सप्ताहाचे उदघाटन मा. आमदार सुभाषभाऊ धोटे, राजुरा विधानसभा क्षेत्र यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या प्रसंगी श्री. अरुणभाऊ घोटे (मा. नगराध्यक्ष ) नगरपरीषद राजुरा, श्री सुनिलभाऊ देशपांडे (मा. उपाध्यक्ष ) नगरपरीषद राजुरा, मा. डॉ. व्हि.एम. डाखोळे सर, वैद्यकीय अधिक्षक उप जिल्हा रुग्णालय राजुरा, डॉ. पदमजा बोरकर मॅडम (एनसीडी) जिल्हा कार्यक्रम समन्वयक चंद्रपूर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. तसेच श्री. शंकर संगमवार सामाजिक कार्यकर्ता राष्ट्रीय पॅलिटिव्ह केअर कार्यक्रम, चंद्रपूर, कु. मिनाक्षी बोडे, कु, शिवानी कुंडले व इतर कर्मचारीवृंद यांची उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमात डॉ. डाखोळे सर ( वैद्यकीय अधिक्षक) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. पदमजा बोरकर, जिल्हा कार्यक्रम समन्वयक यांनी पॅलिटिव्ह केअर हे वैद्यक शास्त्रातील दुर्धर आजारांनी ग्रस्त रुग्णांची काळजी घेण्याचे काम करते व काही अंशी रुग्णांना आराम देण्याचे कार्य केल्या जाते यांची सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमध्ये कर्करोग, पक्षघात, हृदयविकार यासारख्या गंभीर आजारी रुग्णांना घरी जावून गृहभेटी देवून त्यांची आरोग्य तपासणी व समुपदेशन केले जाते. या कार्यक्रमाचा प्रारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथून मा. चिंचोळे सर (जिल्हा शल्य चिकीत्सक ) यांच्या मार्गदर्शनाखाली व पॅलिटिव्ह केअर टिम चंद्रपूर यांच्या सहकार्याने उप जिल्हा रुग्णालय, राजुरा येथे एनसीडी विभागामार्फत घेण्यात आला.