google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

जिल्हास्तरीय मैदानी खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्राकरिता खेळाडू निवड चाचणीचे आयोजन

चंद्रपूर:- केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाने खेलो इंडिया सेंटर अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल, चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय मैदानी खेलो इंडिया अनिवासी प्रशिक्षण केंद्राकरिता सन 2024-25 या वर्षात खेळाडू निवड चाचणीचे आयोजन 6 ऑगस्ट 2024 या कालावधीत करण्यात आले आहे

याकरीता 14 वर्ष आतील मुले/मुली व 16 वर्षाआतील मुले/मुली करीता 6 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 8 निवड चाचणी होणार आहे. यात उंचीला प्राधान्य देण्यात येईल. सर्व खेळाडूंनी स्वत:च्या पूर्ण तयारीने यावे. प्रशिक्षण केंद्र हे अनिवासी आहे. आधार कार्ड व जन्मदाखला प्रत सोबत आणावे आणि किमान प्रशिक्षणार्थ्यांचा जन्म 12 डिसेंबर 2013 नंतरचा असावा.

उपरोक्त निवड चाचणीकरिता ‍जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी आपली नावे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे कार्यालयीन वेळेत नोंदणी करावे. अधिक माहितीकरिता राज्य क्रीडा मार्गदर्शक (बॉक्सींग) विजय डोबाळे (मो.क्र. 9545858975) व खेलो इंडिया प्रशिक्षक रोशन भुजाडे (मो. क्र. 7798174435 ) यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड चंद्रपूर यांनी कळविले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button