google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

शहर पोलिसांची सुगंधित तंबाकू तस्करवार धडक कारवाई

चंद्रपुर :- संपूर्ण महाराष्ट्रात सुगंधित तंबाकू वर बंदी आहे. सुगंधित तंबाखू वर बंदी असून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखूची विक्री केली जाते. परंतु आता जिला पोलिस प्रशासनाने यांच्यावर आळा घालण्यासाठी चांगलीच कमर कसली आहे.

आज दि.०६/०५/२०२४ रोजी दुपारी १२.३०वा सुमारास पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हद्दीत पोउपनि संतोष निंभोरकर, सफौ/विलास निकोडे, पोहवा/सचिन बोरकर, मपोहवा/भावना रामटेके असे पेट्रोलिंग करीत असतांना गुप्तबातमीदार यांचेकडुन माहिती मिळाली की, बाबुपेठ ब्रिजचे खाली परीसरात राहणारा अरविंद निवलकर याने महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधीत असलेला सुंगधित तंबाखु विक्री करीता घरी ठेवला आहे, अशा माहितीवरून पोलीसांनी रेड करून इसम नामे अरविंद शामराव निवलकर, वय २५ वर्षे, धंदा मजुरी, जात-वाढाई, रा. हिदुस्थान लालपेठ कॉलरी नं.३, बाबुपेठ चंद्रपूर यांचे राहते घरातुन पंचाचे समक्ष होला हुक्का शिशा तंबाखु प्लास्टिक पॉकीट, एकुण ४५, पॉकीटचे वजन १ किलो, प्रति किं. ७५०/-, (एका पॉकीटामध्ये २०० ग्रॅम वजनाचे ५ तंबाखुचे पाकीट) असा एकुण ३३,७५०/- रू माल जप्त करण्यात आला आहे.

 

पुढील कार्यवाही करणेकामी अन्न सुरक्षा अधिकारी, सहायक आयुक्त यांचे कार्यालय, अन्न व औषध प्रशासन (म.रा) चंद्रपूर यांना पत्राव्दारे कळविण्यात आले असता पुढील कार्यवाही त्यांनी करून सरकारतर्फे दिलेल्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे गु.र.नं – ३९९/२०२४ कलम ३०(२) (अ), २६ (२) (i), २६(२) (iv), ५९ अन्न सुरक्षा आणि मानके अधि. २००६, सहकलम ३२८,१८८,२७३ भा.दं.वि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा.श्री. सुदर्शन मुमक्का पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्रीमती रिना जनबंधु अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, श्री. सुधाकर यादव उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्रीमती प्रभावती एकुरके पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन चंद्रपुर शहर यांचे सुचनेप्रमाणे श्री. मंगेश भोगांडे स.पो.नि, श्री. संतोष निंभोरकर पोउपनि, सफौ/विलास निकोडे, पोहवा/सचिन बोरकर, मपोहवा/भावाना रामटेके, पोहवा/संतोष पंडीत, पोशि/इम्रान खान गुन्हे शोध पथक, पो. स्टे चंद्रपूर शहर यांनी कारवाई केली.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button