google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

“जागतिक पशुचिकित्सा दिनानिमित्य” बर्ड्स केअरिंग फाउंडेशन तर्फे पक्ष्यांसाठी जलपात्र वाटप

आज दिनांक २८ एप्रिल २०२४ ला “जागतिक पशुचिकित्सा दिनानिमित्य” बर्ड्स केअरिंग फाउंडेशन तर्फे पाली बुद्ध विहार येथे समस्त उपस्थित विध्यार्थ्यांना व आसपासच्या नागरिकांना जलपात्र वाटप करण्यात आले. उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावली असते, त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होते त्याच्या परिणाम पक्ष्यांना योग्य त्या प्रमाणात पाणी मिळत नाही,त्यामुळे पक्ष्यांचे जिवाचे धोके निर्माण होते. यावर योग्य उपाय कसा करता येईल मोलाचे मार्गदर्शन या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. माडेकर सर यांनी केले त्यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धन कसं करावे तसेच पशु-पक्षी, वने आणि वन्यजीव यांचे रक्षण कसे करावे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रम मध्ये माजी नगराध्यक्ष संपत कोरडे,बर्ड्स केअरिंग फाऊंडेशन चे अध्यक्ष समीर शेख,सचिव शुभम गेडाम,कोषाध्यक्ष प्रविण कुंभारे,सदस्य आफताब पठाण, निकेत कोरडे, आशिष गेडाम,संध्या कोरडे,अजान शेख आदि मान्यवर गण उपस्थित होते.

Share
Back to top button