google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

अवैध वाळू चोरी प्रकरणात २ आरोपी अटक

चंद्रपूर/वरोरा:- दि. १४/०५/२०२४ रोजी मुखबीर दवारे माहीती मिळाली की, एक पांढ-या रंगाचा मुंडा असलेला टिपर क्र.एम.एच.४० वाय. १६९१ हा हायवे रोड वरून आशीर्वाद ले-आउट वरोरा कडे अवैध्य रित्या रेती चोरी करून वाहतुक करीत आहे अशा गुप्त खबरेवरून श्रीमती नयोमी साटम, सहायक पोलीस अधिक्षक, वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली आशीर्वाद ले-आउट वरोरा येथील हनुमान मंदीराजवळ गेलो असता हनुमान मंदीराजवळ एक पांढ-या रंगाचा टिपर क.एम.एच.४० वाय.१६९१ हा तिथे अवैध्यरित्या रेती वाहतुक करतांना मिळून आला.

 

व सदर टिपर ड्रायव्हर जागेवर हजर मिळून आला. वरून घटनास्थळावरून ०१) टिपर क. एम.एच.४० वाय. १६९१ ०२) ०३ ब्रास रेती असा एकुण १४,१०,५०० रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व आरोपी नामे मिथुन यशवंत मडावी वय ४२ वर्ष धंदा ड्रायव्हर रा. सालोरी ता. वरोरा जि. चंद्रपूर तसेच सदर टिपर क. एम.एच.४० वाय. १६९१ चा मालक नामे राजेंद्र घनश्याम गोवारदिपे वय ३९ वर्ष धंदा टिपर मालक रा. बोर्डा ता. वरोरा जि. चंद्रपूर यांचेवर कलम ३७९,३४ भादवि. सहकलम ४८ महाराष्ट्र महसुल अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कारवाई मध्ये मा.नयोमी साटम मॅडम, सहायक पोलीस अधिक्षक, वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरिक्षक अमोल काचोरे, सहायक पोलीस निरिक्षक विनोद जांभळे, नापोशि मोहनलाल निषाद, संदीप मुळे, महेश गावतुरे, विशाल राजुरकर यांनी केली आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button