google.com, pub-7118703508047978, DIRECT, f08c47fec0942fa0
आपला जिल्हा

चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्र वर्धापन दिनाच्या निमित्त युनिट बॉडीचे उद्घाटन

चंद्रपूर:- चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्र वर्धापन दिनाच्या निमित्त साधून दिनांक 16/01/2023 महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक कंत्राटी कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष असलेले बंडू हजारे सह सम्पर्क प्रमुख बाळासाहेबांची शिवसेना
यांच्या नेतृत्वात चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख नितीन मते यांच्या हस्ते युनिट बॉडीचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी सचिव संतोष पारखी उपाध्यक्ष सचिन गोरे युनिट अध्यक्ष संतोष ढोक सचिव आशिष गोमासे उपाध्यक्ष जगदीश सहारे सहसचिव वैभव सोनकुसरे विशाल कावणे उपजिल्हा प्रमुख कमलेश शुक्ला विष्णू बुजोने तालुका प्रमुख पंकजवाडेट्टीवर भद्रावती शहर प्रमुख आशिष ठेंगणे प्रशिद्धी प्रमुख चंद्रपूर
. सहसंपर्क प्रमुख तथा संस्थापक अध्यक्ष बंडू हजारे यांनी बोलताना कामगारांना न्याय व हक्कासाठी लढा देण्यासाठी यूनियन व बाळासाहेबांची शिवसेना आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल, असे सांगितले. तसेच कार्यक्रमाचे उदघाटक संस्थापक सल्लागार तथा बाळासाहेबांची शिवसेना, चंद्रपुर जिल्हाप्रमुख नितिनभाऊ मत्ते यांनी कामगारांनी एकत्र येवून लढा देण्याचे आव्हाहन केले व सि एस टी पी एस मध्ये कामगारांचे शोषण कशा प्रकारे होत आहे व अधिकारी व ठेकेदारांचे कसे संगनमत आहे याचा पाढा चं वाचला या कारखान्यात महीला कामगारांची कशी हेळसांड होत आहे त्यांना धड शौचालय नाही पाळणाघर नाही लहान मुलांना व त्यांच्या मातांना आरामासाठी विशेष महीला कक्ष नाही अशा प्रकारे महीला कामगारांची पिळवणूक होत आहे व या कारखान्याचे ठेकेदार व अधिकारी कसे गलेलठ्ठ होत आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले व यासाठी महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कामगार सेना व बाळासाहेबांची शिवसेना व या राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे सोबत तभा किरण पांडव पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख यांचे सोबत कामगारांनी उभे राहीले पाहीजे पाठपुरावा करून कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी मि सदैव प्रयत्न करिन असे स्पष्ट आश्वासन त्यांनी या प्रसंगी कामगारांना दिले .. संचालन उपाध्यक्ष जगदीश सहारे तर आभार अध्यक्ष संतोष ढोक यांनी मानले*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button